Ticker

6/Breaking/ticker-posts

सचिन वाझेंच्या राजीनाम्यासाठी वाढता राजकीय दबाव, ठाकरे सरकारमध्येच दोन गट

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. वाझेंच्या राजीनाम्यावरुन मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन मतप्रवाह असल्याची माहिती आहे.

सचिन वाझे दोन दिवसांपासून घरी नाही

सचिन वाझे दोन दोन दिवसांपासून ठाण्याच्या राहत्या घरी आलेच नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वाझेंचा राजीनामा आज घेण्यावरुन त्यांच्यावर राजकीय दबाव वाढत असल्याचं बोललं जातं. महाविकास आघाडी सरकारमध्येच सचिन वाझेंबद्दल दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एक गट वाझेंच्या राजीनाम्यावर ठाम आहे, तर दुसरा त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.

राठोडांचा राजीनामा, वाझेंचा का नाही, विरोधकांचा सवाल

दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनात आजही सचिन वाझेंच्या राजीनाम्यावर विरोधक रान उठवणार आहेत. विरोधकांकडून सचिन वाझेंच्या अटकेची मागणी सातत्याने होत आहे. तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी संशय असलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तर सचिन वाझेंचा राजीनामा का घेत नाही, असा थेट सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

सचिन वाझे पोलीस आयुक्तांच्या भेटीला

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर सचिन वाझे काल तिसऱ्यांना पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले होते. तिथे त्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतल्याचं कळतंय. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणा चा तपास आता वेग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गाडी माझ्याकडे होती हा आरोप आहे का? ”

या भेटीनंतर ते बाहेर पडले असता त्यांनी माध्यमांनी काही प्रश्न विचारले. त्यात मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं असता, गाडी माझ्याकडे होती किंवा नव्हती यात आरोप काय आहे? असा सवाल त्यांनी केला. तसंच हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोप आपण वाचून त्यावर प्रतिक्रिया देऊ, असंही वाझे यांनी म्हटलंय. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ATS करत आहे. त्यासंदर्भात मनसुख हिरेन यांचा मृतदेह त्या ठिकाणी सापडला होता त्या मुंब्रा रेतीबंदर खाडीवर ATS ची टीम काल गेली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या