Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डी विना मास्कधारकांवर दंडात्मक कारवाई

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी :-पाथर्डी शहरात प्रांताधिकारी देवदत्त केकाण ,पोलीस निरीक्षक रणजित डेरे,पालिकेचे कार्यालयीन प्रमुख अय्यूब सय्यद यांच्या पथकाने रस्त्यावर उतरून बिना मास्क फिरणाऱ्या आणि दुकानात नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

 पाथर्डी शहरात प्रांताधिकारी केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस व पालिका प्रशासनाने बिना मास्क व दुकानात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यावर कारवाई करत दंडात्मक वसुली केली आहे.आज दुपारी अचानक पने प्रांधिकारी देवदत्त केकाण हे आपल्या पथकासह हॉटेल, मंगल कार्यालय, दुकाने ,रेस्टॉरंट गर्दी होणाऱ्या अश्या अनेक जागी जाऊन त्यांनी पाहणी करत कारवाई करून काही ठिकाणी नियम पाळण्याच्या सक्तीच्या सूचना करण्यात आल्या.तर  दंडही ठोटवला.

 राज्यात वाढत कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता सध्या आरोग्य विभाग,महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराजसंस्था ऍक्शन मोड मध्ये आल्या आहेत. यापूर्वीच राज्य सरकारने लग्न समारंभ,यात्रा,धार्मिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमावर निर्बंध आणले आहेत. कारवाई दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, निलेश म्हस्के,पालिकेचे सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण हाडके,रामदास गुंजाळ,बाळासाहेब डोमकावळे,नवनाथ आमले,कुरेश पठाण आदी सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या