Ticker

6/Breaking/ticker-posts

सावली सोसायटीत वीज पडल्याने झाड पेटले

 


शनिवारी रात्री सावेडी मधील गुलमोहर रोडवरील सावली सोसायटी मध्ये वीज पडल्यानंतर नारळाचे झाडावर अग्नितांडव सुरु होते छायाचित्र -विजय मते

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

नगर  : -  सावेडी उपनगरात गुलमोहर रोडवर शनिवारी रात्री नऊ च्या सुमारास वीज पडल्याने एक नारळाचे झाड पेटले तर वसाहती मधील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले मात्र जीवितहानी झाली नाही

 याबाबत सविस्तर माहिती अशी की हवामान खात्याने तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता काल रात्री नगर जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी संगमनेर तालुक्यातील गावात गारपीट झाली त्याच वेळेत नगर शहरात हलका पाऊस पडत होता मात्र मेघगर्जनेसह परिसरात विजेचा कडकडाट सुरू होता .

सावेडी मधील गुलमोहर रोडवरील सावली सोसायटी मध्ये अचानकपणे खूप मोठा आवाज होऊन वीज पडली ही वीज नारळाच्या झाडावर पडताच अग्नीचे तांडव सुरू झाले या भागाचे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी तातडीने वीज वितरण कंपनी ला सम्पर्क करून वीज पुरवठा खंडित करण्यासाठी सांगितले अग्निशमन विभागाशी सम्पर्क करून आग विझविण्यासाठी गाडी मागवली कॉलनीत नागरिकांना घाबरून न जाता धीर देत सुनील मानकर यांनी प्रयत्न केले .            

वीज पडून कोणाचे टीव्ही फ्रिज जळाले तर कोणाचे वीज मीटर जळून खाक झाले आर्थिक नुकसान झाले असले तरी जीवितहानी मात्र झाली नाही मध्यवस्तीत वीज पडल्याने नागरिक मात्र भयभीत झाले होते वीज पडली तेव्हा आवाज इतका मोठा होता की भुंकप झाल्या सारखे वाटत होते  .      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या