Ticker

6/Breaking/ticker-posts

जेऊरमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव .

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

     जेऊर:-   नगर तालुक्यातील जेऊर येथे तब्बल चार महिन्यांच्या अवधीनंतर कोरोनाचा रुग्ण सापडल्याने गावामध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे . 

     जेऊर गणात सर्वप्रथम डोंगरगण येथे कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर जेऊर येथे जून २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले. त्यानंतर या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. ऑक्टोबर २०२० नंतर जेऊर गावामध्ये एकही रुग्ण आढळून आला नव्हता.तब्बल चार महिन्याच्या कालावधीनंतर चालू आठवड्यात जेऊर गावांमध्ये रुग्ण आढळून आल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

   जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या १६ गावांमध्ये आजतागायत ३९८ रुग्ण आढळून आलेले आहेत. तर १७ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणुने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

 काळजी घेणे गरजेचे

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आपली व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कचा वापर करावा. वारंवार हात स्वच्छ धुवावेत. तसेच सामाजिक आंतर राखणे गरजेचे आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.असे आवाहन जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. योगेश कर्डिलेयांनी केले आहे .

 शासनाच्या आदेशाचे पालन करावे

नागरिकांनी कोरोना बाबत शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. विवाह  सोहळा तसेच इतर धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी टाळावी.असे ग्रामविकास अधिकारी सविता लांडे यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या