Ticker

6/Breaking/ticker-posts

तरुणांनी सचोटिने व्यवसाय करावा - माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

 

श्रीशंभु मोटर्सच्या भव्य ३ व्हिलर शोरुमचे उद्‌घाटन

















लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ .नगर : सध्या सर्वच क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे, मात्र निश्चित ध्येय बाळगून जिद्द आणि चिकाटीने व्यवसाय केल्यास यश हमखास मिळते, त्यामुळे तरुणांनी नोकऱ्यांसाठी वणवण करण्यापेक्षा  सचोटीने व्यवसाय करावा असे आवााहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले .

नगर - औरंगाबाद महामार्गावर शेंडी बायपासच्या अलीकडे उभारण्यात आलेल्या अतुल अँटो लिमिटेडचे अधिकृत वितरक श्रीशंभु मोटर्स या  भव्य शोरुमचे उद्घघाटन नुकतेच त्यांचे हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते . 

पुढे बोलतांना माजी मंत्री कर्डिले म्हणाले की , नगर आता वेगाने विस्तारत आहे . एकेकाळी वेशीच्या बाहेर फारशी वस्ती नव्हती परंतु आता शेंडी बायपास पर्यंत लोक वस्ती वाढली आहे . दळण -वळणाची साधन ही त्याप्रमाणात वाढत आहेत . आपण या परिसराच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या असून येत्या काळातही त्या सुरुच राहतील असे सांगितले . यावेळी नेहमीच्या विनोदी शैलीत राजकीय कोट्या करत त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते विस्तारीत दालनाचे देखिल उद्घाटन पार पडले . त्यांनी ही तरुण उद्योजकांना व व्यावसायिकांना दिशादर्शक असे मार्गदर्शन केले . कोविड मुळे सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा पार पडला . यावेळी उपस्थितांचे स्वागत श्रीशंभु मोटर्सचे संचालक गोकुळ वालझाडे व गोरख सांगळे यांनी केले .

यावेळी साईदीप टायरचे संचालक आदेश भगत, पोखर्डीचे तंटामुक्तिचे अ‍ध्यक्ष विक्रमराजे भगत ,नगर ता. साखर कारखान्याचे माजी संचालक विठठ्लराव भगत , नाथासाहेब कराळे, पोखर्डीचे उपसरपंच ज्ञानदेव कराळे, सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव वारुळे आदि उपस्थित होते. 

श्रीशंभु मोटर्स मध्ये पेट्रोल, डिझेलेसह, एलपीजी , सिएनजी व विद्युत चार्जिंगवरील   आधुनिक अशा मालवाहतूक व पॅसेंजर 3 व्हिलर रिक्षा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . कर्जसुविधा उपलब्ध असून इच्छूकांनी शोरूमशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या