लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : रेखा
आणि अमिताभ या दोन्ही कलाकारांची नावे जेव्हा एकत्र घेतली जातात तेव्हा त्यांच्या
अर्धवट लव्हस्टोरीची आठवण नेहमी येत असते. रेखा आणि अमिताभमध्ये जवळीकता होती, हे सगळ्यांनाच माहित आहे. आज ते
दोघे एकत्र नाहीत. पण आजही या दोघांमध्ये एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल लोकांना
माहित नाही.
रेखा अनेकदा तिच्या भांगेत कुंकू लावताना
दिसून येते. त्यामुळे ती नक्की कोणाच्या नावाचे कुंकू लावते हा प्रश्न उपस्थित
होतो. रेखाला काही लोकांनी हा प्रश्न विचारला. पण तिने नेहमीच हुशारीने या
प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. अनेक वेळा प्रश्न विचारल्यावर तिने सांगितले की, ती ज्या शहरातून येते तिथे
कुंकू लावणे फॅशनचा भाग आहे.
रेखाने कधी तिच्या भांगेतील कुंकूची खासियत
स्वत:हून सांगितली नसली तरी अभिनेता पुनीत इस्सरची पत्नी दीपालीने या गोष्टीचा
खुलासा केला आहे. पुनीत इस्सरची पत्नी दीपालीने सांगितले की, रेखा आपल्या भांगेत अभिनेता
अमिताभ बच्चनच्या नावाचे कुंकू लावते. दीपालीच्या या दाव्यावर रेखाने कोणत्याही
प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
' कुली' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका अॅक्शन सीनमध्ये अमिताभच्या पोटावर चुकून
पुनीत इस्सरचा मुक्का लागला होता. या घटनेचा परिणाम असा झाला की, महानायक अमिताभ बच्चन जिथे मरता मरता वाचले होते. तिथेच पुनीतचे करिअर
सुरू होऊन संपुष्टात गेले. पुनीतला दूरदर्शनवरील मालिका महाभारत मधील दुर्योधन या
पात्रामुळे लोकप्रियता मिळाली. दुर्योधन या पात्राला पुनीतने वेगळ्याच उंचावर नेऊन
ठेवले की तो घरा-घरात ओळखला जाऊ लागला.
0 टिप्पण्या