Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासार मधील मारुती मंदिर ते गहीनाथ फाटा हा रोड रहदारीसाठी मोकळा करा

माहिती अधिकार महासंघ ची मागणी

      









लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार : -खरवंडी कासार ग्रामपंचायत कार्यालय मारुती मंदिर ते गहीनाथ फाटा एसटी स्टँड या जुण्या रस्त्यावरील अतिक्रमण काढुन हा रस्ता रहदारी साठी मोकळा करण्याची मागणी ग्रामस्थाणी प्रातांधीकारी यांना निवेदनादवारे केली आहे .

जुन्या काळात म्हणजेच पूर्वीपासून ग्रामस्थांसाठी व वाहतुकीसाठी व गावामध्ये रॉकेल टँकर पाण्याचा टँकर व इतर वाहनासाठी  सर्व सामान्य नागरिकांना येण्यासाठी व जाण्यासाठी पूर्वीपासून होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये या रस्त्यावर दोन्ही साईट च्या लोकांनी हा रोड पूर्णतः अतिक्रमण करून बंद केलेला आहे तरी पूर्वीपासून चा रस्ता जो गावामधून बाहेर जाण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे तो रस्ता खुला करण्यात यावा असे नागरिकांचे मागणे आहे,

परंतु अद्याप पर्यंत कोणीही पाठपुरावा केला नाही व शासन दरबारी दाद मागितली  नाही ,स्थानिकांच्या दबावापोटी कोणीही पुढे येण्यास तयार नाही म्हणून अद्याप पर्यंत हा रस्ता खुला होऊ शकला नाही परंतु स्थनिक रहिवाशी  नागरिकांची मागणी आहे की, हा रस्ता आम्हाला मेन रोडला येण्या-जाण्यासाठी अत्यंत जवळचा व  गरजेचा आहे म्हणून जे अतिक्रमण या रस्त्यावर झालेला आहे ते अतिक्रमण काढून सर्वसामान्य नागरिकांसाठी हा रास्था वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी स्थनिक रहिवाशी नागरिकांची मागणी आहे .

तरी या निवेदनाचा विचार करून सर्वसामान्य नागरिकांना तहसीलदार  व जिल्हाधिकारी यांनी  हा रस्ता खुला करून येण्याजाण्यासाठी मोकळा करून गावकर्यांना वाहतूक व येण्याजाण्यासाठी  मोकळा करून  द्यावा अशी मागणी माहिती अधिकारमहासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेंद्र जायभाये यांनी पाथर्डी चे प्रांत अधिकारी व  तहसीलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, या वेळी रस्था मोकळा करण्यासाठी प्रांत अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा    केली . या निवेदनाच्या  जिल्हाधिकारी  अहमदनगर  यांना पाठविले आहेत . 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या