लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी /शेवगाव :- दोन्ही तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह
गारपिटीच्या पावसाने शेती व मालमत्तेचे मोठे नुकसान
झाले आहे.आज दुपारी तालुक्यात झालेल्या जोरदार वादळ आणि गारपिटीने शेतातील पिकांचे
व शेतमालाचे मोठ्या स्वरूपात नुकसानी झाल्या आहे. पाथर्डी शहरातील अमरधाम येथील जुने मोठे माढुकीचे झाड बाजूला असलेल्या राष्ट्रीय
महामार्ग कल्याण -निर्मल( विशाखापट्टणम) रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक बंद
झाला होता. येथून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरवर हे झाड पडल्याने ट्रॅक्टरचे मोठे नुकसान
झाले. मात्र यात सुदैवाने चालकाला कोणती इजा झाली नाही.अमरधाम येथे राहणाऱ्या रखवालदाराच्या घरावर झाडाचा काही भाग पडल्याने पत्रे व भिंत
कोसळली असून यात जीवित हानी झाली नाही घरातील वस्तूसह अन्नधान्याची नासाडी झाली.
भुतेटाकळी,येळी,
मोहज देवढे, कासार
पिंपळगाव,हनुमान टाकळी,पागोरी पिंपळगाव,साकेगाव याभागात
धुव्वाधार गारपिटीने आंबा, कांदा, गहू ,हरबरा, मका भुईमुग व ऊसाचे अतोनात नुकसान झाले.तहसीलदार शाम वाडकर यांनी पंच नाम्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका
कृषीधिकारी प्रवीण भोरे ,कृषी सहाय्यक गोरक्ष पठाडे ,महादेव पठाडे यांनी गारपीट झालेल्या भागाची दौरा करून प्राथमिक शेतीच्या
नुकसानीची माहिती घेतली.मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसानी झाल्या आहेत त्यामध्ये कांद्या पिकाचे मोठ्या
स्वरूपातनुकसानी आहेत. अजून हि पुढील दोन दिवस पाऊसाची शक्यता आहे. ज्याभागातील पिके काढणीस आले असतील अशी पिके
काढून सुरक्षित जागी ठेवण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी भोर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या