लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
संगमनेर : - बऱ्याचदा आपण वाहनांना आग लागल्याच्या घटना पाहिल्या आहेत. ‘द बर्निंग ट्रेन’ हा सिनेमा याच दृश्यामुळे गाजला. परंतु जेव्हा समोर अशी घटना घडते तेव्हा मात्र भयानक परिस्थिती निर्माण होते. असाच एक थरार संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडला. येथे एका मालवाहू ट्रकने पेट घेतला.
चालकाने सावधानता बाळगत हा ट्रक शेताजवळ नेला. यावेळी परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीने ट्रकमधील लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले आहे. मालवाहू ट्रक क्रमांक (आर जे १४ जीजे ३९७१) हीच्यावरील चालक विजय नारायण डुबे हा पुणे येथून लॅपटॉपसह आदि साहित्य घेवून गुडगाव हरियाणाकडे जात होता.
दरम्यान, वडगाव फाट्यावर आला असता या मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होवून मालट्रकला आग लागली असावी, असा अंदाज आहे.
0 टिप्पण्या