Ticker

6/Breaking/ticker-posts

मुकुंदनगरच्या पाणी टाकीच्या स्वच्छतेचे काम महापालिकेकडून सुरु

 

नगरसेवक आसिफ सुलतान यांच्या आंदोलनाची दखल
फेज टू चे राहिलेले काम पुर्ण होऊन पाण्याच्या टाकीतून मुकुंदनगरच्या नागरिकांना मिळणार पाणी



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 


अहमदनगर :- नगरसेवक आसिफ सुलतान यांनी बुधवारी महापालिकेत आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलनाची दखल घेत आठ वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या मुकुंदनगरच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छतेचे काम महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. या कामाची पहाणी नगरसेवक आसिफ सुलतान, सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख, मनपाचे इंजि. इमरान खान यांनी केली यावेळी मनपाचे कर्मचारी उपस्थित होते. फेज टू चे राहिलेले काम पुर्ण करुन पाण्याच्या टाकीतून मुकुंदनगर भागातील नागरिकांना पाणी मिळणार असून, या भागातील अनेक वर्षांचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे.
मुकुंदनगर प्रभाग 3 मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत असताना, या भागात वेळेवर नियमीत पाणीपुरवठा करण्यासह या भागातील स्वच्छता, ड्रेनेजलाईन, बंद पथदिव्यांचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. महापालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सदर प्रश्‍न सुटत नसल्याने नगरसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात झोपाकाढू आंदोलन करण्याचा प्रयत्न करुन, मनपाच्या अंदाजपत्रकीय सभेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने मुकुंदनगर येथील पाण्याचा गंभीर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पाऊले उचलली आहेत. आठ ते दहा दिवसात मुकुंदनगरचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. तसेच महापालिकेच्या वतीने सदर भागासाठी स्वच्छता कर्मचारी व घंटा गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाला सुचना करणारे आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त व पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांचे नगरसेवक सुलतान यांनी आभार मानले.

नगरसेवक आसिफ सुलतान म्हणाले की, मुकुंदनगर भागात फेज टू पाण्याची पाईप लाईनचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. पाण्याची उंच टाकी बांधून आठ वर्ष झाली मात्र ती कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. फेज टू चे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण केल्यास येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. सदर प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने या भागात मनपा कर्मचारींचे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. स्वच्छता कर्मचारी कमी असल्याने प्रभाग पुर्णपणे स्वच्छ होत नव्हते. या समस्यांचा कायमस्वरूपी निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडू कामगारांची संख्या वाढविणे अपेक्षित आहे. या भागांमध्ये ड्रेनेजलाईन तुंबून रस्त्यावरुन घाण पाणी वाहत असल्याने प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे तुटलेली आहे. ड्रेनेजचे पाईप खचले असून ते दुरुस्त करून नवीन लाईन टाकण्याची आवश्यकता आहे. प्रभागात काही ठिकाणी पथदिवे नसून व काही ठिकाणी बंद पडले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या