प्रभाग क्र. १५ मध्ये दत्तमंदिर परिसरात रस्ता डाबरीकरणाचा शुभारंभ
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ.नगर :- शहर विकासाचे प्रश्न मार्गी
लावण्यासाठी आमदारकीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत. पुढील काही
काळात विकास कामातून विकसित शहर निर्माण होईल. या दृष्टीकोनातून उपाययोजना केल्या
आहेत. यासाठी नियोजनाची गरज आहे.नागरिकांच्या सहकार्यातून विकास कामे मार्गी लावली
जातील. शहराचा समांतर विकास हाच अंजेठा असून सर्व भागाला विकास कामासाठी निधीचे वाटप
करीत आहे. विकास कामामध्ये कधीही पक्षीय राजकारण आणले जात नाही. रेल्वेस्टेशन
परिसराचा विकास व्हावा यासाठी संभाजी पवार व विजय गव्हाळे यांनी विकासकामासाठी
नेहमीच पाठपुरावा केला आहे. यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे
मार्गी लावली आहेत. सीनानदी वरील पुलामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे.
असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
प्रभाग क्र. १५ मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास
निधीतून दत्त मंदिर रेल्वेस्टेशन परिसरातील रस्ता
डाबरीकरण कामाचा शुभारंभ सपन्न झाला. यावेळी नगर सेवक मनोज कोतकर,
माजी नगर सेवक विजय गव्हाळे, माजी नगर सेविका आशाताई
पवार, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, दत्तात्रय खैरे, अनिकेत आगरकर, मयुर बागरे, दिपक लोढे, विनोद
चंगलानी, मुस्ताक शेख, शरद दळवी,
शिवाजी वाघ, हेमत थोरात, शोभाताई बडे, पांडुरंग पालवे, महाळू
शिपनकर, लक्ष्मण सोनाळे, दिलीप कदम,
रमेश खडागळे, छोटू सुपेकर, रमेश वाघमारे, ताराचंद आंबेकर, अर्जुळ हावेल, भाऊ चौधरी, बाळासाहेब
ठाणगे, नंदकुमार चंगलानी, राजेंद्र
पवार, विशाल देशमुख, आदी उपस्थित होते.
आबेकर ताई, जाधव ताई, औटी काकू,
काका वैष्णव, आदी उपस्थित होते.
संभाजी पवार म्हणाले की, आमदार संग्राम जगताप
यांचे रेल्वेस्टेशन परिसराच्या विकास कामासाठी मोठे योगदान आहे. जेव्हा जेव्हा या
भागातील नागरिक त्यांच्याकडे विकास कामाची मागणी करतात तेव्हा तेव्हा विकास
कामासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली
आहे. विकास कामाचे नियोजन करून प्राधान्यक्रम ठरविला असून त्यानुसार विकास कामे
केली जात आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा विकास कामे करण्याची गरज पडत नाही असे ते
म्हणाले. विजय गव्हाळे म्हणाले की, रेल्वे स्टेशन
परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दलित वस्ती आहे. या भागाच्या विकासाला चालना मिळावी
यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. याचबरोबर
केंद्र व राज्यसरकारच्या विविध योजना दलित वस्तीपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात
आहे. पुढील काळातही आम्ही सर्वजण या भागाच्या विकासकामासाठी गटीबंद्ध आहोत. असे ते
म्हणाले.
0 टिप्पण्या