Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात संगणक टायपिंग प्रमाणपत्र परिक्षा घेण्यास परवानगी

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

नगर - शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परिक्षा जीसीसी टीबीसी  स्पेशाल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर्स ॅण्ड स्टुडन्ट (जीसीसी एसएसडी सीटीसीमार्च 2021 अमरावती  हिंगोली जिल्हा वगळा राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात घेण्यास महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने परवानगी दिली असल्याची माहिती राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी दिली.

 या संदर्भात परिक्षा परिषदेचे उपायुक्त हारुण अतार यांच्या सहीने परिपत्रक जाहीर करण्यात आले असूनत्यात म्हटले आहे की जीसीसीटीबीसी  जीसीसी एसएसडी सीटीसी परिक्षा मार्च 2021 चे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होतेदि.26/2/2021 च्या आदेशा अन्वये विषयांकित परिक्षा यवतमाळ  औरंगाबाद जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यामध्ये पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार परिक्षा घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होतेदि.26/2/2021 च्या शुद्धीपत्रकान्वये विषयांकित परिक्षा औरंगाबाद जिल्हा वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यामध्ये पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार घेणेबाबत निर्देश देण्यात आले होते.

 दि.26/2  दि.1/3 च्या आदेशान्वये अनुक्रमे अमरावती  हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत असलेला कोविड-19 चा संसर्ग पाहता या आदेशान्वये जीसीसी टीबीसी  जीसीसी एसएसडी सीटीसी परिक्षा मार्च 2021 ही परिक्षा अमरावती  हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहेराज्यातील इतर सर्व जिल्ह्यामध्ये ही परिक्षा देण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे परिक्षा परिषदेने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या