Ticker

6/Breaking/ticker-posts

सचिन वाझे 'कार'नामे : अँटिलियापासून मुंब्रा खाडीपर्यंत सहा गाड्यांचा वापर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:-उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या जिलेटीन स्फोटकांपासून ते ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपर्यंतच्या घडामोडींमध्ये आतापर्यंत दहशतवादविरोधी पथकाने ATS सहा गाड्या हस्तगत केल्या आहेत. एटीएसने मंगळवारी दमण येथे छापा टाकून एक व्होल्व्हो कार हस्तगत केली. या कारचा वापर मनसुख यांच्या हत्येसाठी केल्याचा संशय एटीएसच्या अधिकाऱ्यांना आहे. यामुळे वादग्रस्त पोलिस अधिकारी  सचिन वाझे यांचे दिवसागणिक 'कार'नामे समोर येत आहेत.

हिरेन यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी क्रिकेट बुकी नरेश गोर आणि लखनभैया एन्काउंटरमधील आरोपी पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला अटक केली. या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून बरीच माहिती एटीएस अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. याच माहितीवरून एटीएसच्या पथकाने दमण येथील एका गोदामामध्ये लपवलेली व्होल्व्हो कार हस्तगत केली. ही कार ठाण्यात आणण्यात आली. 

त्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने तिची तपासणी केली. यामध्ये दोन बॅग, तीन जोडी कपडे, दोन चार्जर तसेच इतर काही साहित्य सापडले. वाझे याचा बिजनेस पार्टनर ही कार सध्या वापरत असून, एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हिरेन यांना घरातून मुंब्रा येथील रेतीबंदरपर्यंत याच कारमधून नेल्याचा संशय आहे. कारमध्ये वाळूचे कण सापडले असल्याचे 'एटीएस'च्या सूत्रांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या