Ticker

6/Breaking/ticker-posts

'उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी उघडावी' , नारायण राणेंचा पलटवार

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

कणकवली : सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपचे नेते असं चित्र सातत्यानं पाहायला मिळत आहे. खासदार नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. त्यावर राणे यांनी आपण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलं आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, ’ असा पलटवार नारायण राणे यांनी ट्वीट द्ववारे केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी राणे यांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राणेंना हा टोला लगावला. अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. नारळ फोडतात आणि पुढे काम होत नाही. पण आपल्या सरकारकडून तसं होणार नाही. ज्या योजना होणाऱ्या असतात त्याचीच आपण घोषणा करतो. त्यामुळे आता या योजनांचा शुभारंभ झालाय. त्या आपण पूर्ण करणार आहोत. या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: त्याचं उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. मी कोणत्याही योजनांच्या केवळ घोषणा करणार नाही. ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्याच घोषणा मी करेल. ज्या घोषणा करेल त्या पूर्णही करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या