Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदला शेवगावमध्ये उत्स्फूर्त प्रसिसाद



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगांव :केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आज शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, यावेळी शेवगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. 

महाविकासआघाडी मधील सर्व घटक पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या सह सर्व पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शवला होता, त्याच अनुषंगाने आज शेवगाव शहरामध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय मोर्चेकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी सर्व पक्षांच्या वतीने करण्यात आली.

शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांनी केंद्र सरकारचा पेट्रोल डिझेल दरवाढ व बंद पडलेली गॅस सबसिडी या बद्दल समाचार घेतला तसेच १२० वीस दिवसापासून शहीद होत असलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्या इतपत वेळ पंतप्रधानांकडे शिल्लक नाही का? असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला, तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश मगरे यांनी शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी केली. यावेळी वंचित चे तालुकाध्यक्ष प्‍यारेलाल भाई शेख यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाकपचे कॉम्रेड संजय नांगरे यांनी भाजप सरकारला शेतकऱ्यांनी हाकलून लावावे असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना केले.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश मगरे, भाकपचे काॕ.संजय नांगरे,बापू राशिनकर, वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, शेवगांव काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कापरे,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बब्रु वडघने, स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, राष्टवादीचे वाहाब भाई शेख, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष कमलेश लांडगे, समीर शेख,वंचितचे शेख सलिम, महिलाध्यक्षा कल्पना खंडागळे, अल्पसंख्यांकचे निजाम पटेल, सेवादल अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सेवादल सेक्रेटरी समीर काझी, काँग्रेस उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, सरचिटनीस दशरथ धावणे, रवी लांडे, विलास निकाळजे, आसिफ काझी,  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या