Ticker

6/Breaking/ticker-posts

आता ‘हे’ तावडे कोण ?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई : मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. काही वेळापूर्वी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. यावेळी विमल हिरेन यांनी तावडे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख केला. त्यानंतर ते तावडे कोण?’ असा सवाल उपस्थित होत आहे. 

आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याबाबत तक्रार केली होती. वेळोवेळी पोलिसांचा फोन येत होता. तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. त्यांना पूर्ण दिवस बसवून ठेवले जायचे. माझ्या पतींनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. त्यांना कालही बोलवण्यात आले. ते काल गेले. पण रात्री घरी परतले नाही. रात्री दहानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवलीवरुन तावडे म्हणून एकाचा फोन आला होता. रात्रभर आम्ही वाट बघितली. सकाळपर्यंत ते आले नाहीत. म्हणून आम्ही तक्रार दाखल केली.

जेव्हा जेव्हा पोलिसांचे फोन येत होते तेव्हा ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करु शकत नाही. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचे आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे,” अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी दिली.

मनसुख हिरेन यांच्या मोठ्या भावाची प्रतिक्रिया 

मनसुख हिरेन यांची हत्या झाली असावी, असा थेट आरोपी मनसुख हिरेन यांचा सख्खा मोठा भाऊ विनोद हिरेन यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. मनसुख जेव्हा घरी आला नाही, तेव्हा मी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना रात्री फोन केला. मनसुख हिरेन यांच्या कुटुबाला पोलिस सरंक्षण मिळावं, अशी मागणी विनोद हिरेन यांनी केली आहे.

कांदिवली क्राईम ब्रांचमध्ये तावडे आडनावाचा अधिकारी नाही

दरम्यान याप्रकरणानंतर टीव्ही 9 मराठीने तावडे नावाच्या पोलिसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली. कांदवली क्राईम ब्रांचमध्ये तावडे आडनावाचे कोणीही अधिकारी कार्यरत नाही. मात्र दहिसर क्राईम ब्रांचला युनिट 12 महेश तावडे नावाचे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. पण क्राईम ब्रांचचे अधिकारी महेश तावडे 1 मार्चपासून सुट्टीवर आहे. तसेच यानंतर टीव्ही 9 वाहिनिने महेश तावडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी मनसुख हिरेन यांना ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणासंदर्भात मला काही माहिती नाही. माझी मनसुख हिरेन यांच्यासोबत बातचीत झाली नाही. मी त्यांना ओळखत नाही, असे महेश तावडे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या