लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई :-महाविकास आघाडी सरकारच्या महसूल आणि नगरविकास
विभागातच कोन
बनेगा करोडोपतीची स्पर्धा सुरू आहे.बिल्डर लाॅबीच्या हिताच्या निर्णयाचा महाप्रताप करून सरकारने
स्वतःच्याच महसूलावर पाणी सोडले असल्याची
घणाघाती टिका भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग
घेताना आ.विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टिका
केली.कोव्हीडच्या नावाखाली सराकार आपली निष्क्रियता लपविण्याचा प्रयत्न करीत
असल्याचा आरोप करुन सरकार फक्त जनतेला मदत करीत असल्याचा खोटा आव आणत असल्याचे सांगितले.
कोव्हीड नंतर महससूलात
वाढ व्हावी म्हणून सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये तीन आणि दोन
टक्क्यांची आणि रेडीरेकनरच्या दरात कपात केली. नगर विकास विभागाने सुध्दा
प्रिमियमचे दर खाली आणून केवळ मुंबईतील बिल्डर लाॅबीच्या हिताचे निर्णय
केले.विकासाचे हित फक्त सरकारने पाहीले.यामध्ये सामान्य माणसाला किती लाभ झाला
याची शंका उपस्थित केली. सरकारने हे निर्णय
मात्र राज्यातील इतर मोठ्या शहरांना का
लागू केले नाहीत असा प्रश्न उपस्थित करून सरकारच्या या निर्णयाचा नेमका फायदा
कोणाला झाला.स्वतात घरे किती सामान्य माणसांना मिळाली आणि राज्याच्या तिजोरीत किती
महसूल जमा झाला याची सरकराने श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आ.विखे पाटील यांनी
केली.
शिवभोजन थाळीवर १२५ कोटी रुपये खर्च
झाल्याच्या दाव्यावर आ.विखे पाटील म्हणाले की,लाॅकडाऊनमुळे
सर्व जनता घरात होती मग तीन कोटी थाळ्या खाल्या कोणी का नुसत्याच पत्र्यावळ्या
होत्या असा प्रश्न उपस्थित करतानाच शेतकरी सर्वच मदतीपासून वंचित आहे.मुख्यमंत्री
कोणाला वार्यावर सोडणार नाही असे फक्त बोलतात प्रत्यक्षात नैसर्गिक आपत्ती मधील ४
हजार ३९२ कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे
सरकारच्या मदतीच्या दाव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दूध उत्पादकांना २५ रूपये एफआरपी लागू
करण्याच्या सरकराच्या निर्णयावर सडकून टिका करताना सहकारी दूधसंघ आणि सरकार
यांच्यात साटेलोटे झाले आहे.खासगी दूधसंघ उत्पादकांना ३१ ते ३२ रूपये इतका भाव देत
असल्याकडे लक्ष वेधून सरकराने दिलेल्या अनुदानाच्या रकमेचे काय झाले याची चौकशी
करण्याची मागणी आ.विखे पाटील यांनी केली.
0 टिप्पण्या