लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : जंगलात मांसाहारी आणि शाकाहारी अशा दोन
प्रकारचे प्राणी राहतात. वाघ, सिंह यांसारखे प्राणी
मांसाहारी विभागात मोडतात. तर हरिण, ससा हे प्राणी शाकाहारी
विभागात.. त्यामुळे निसर्गनियमाप्रमाणे वाघ आणि सिंह शाकाहारी प्राण्यांची शिकार
करतात. पण नुकतंच ससा आणि बिबट्याच्या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत
आहे. यात एवढाचा ससा हा बिबट्यावर भारी पडल्याचे दिसत आहे.
बिबट्याची सशाला पकडण्यासाठी झेप
सध्या
सोशल मीडियावर एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. यात एक ससा जंगलातील रस्त्याच्या
कडेला चाऱ्याचा शोध घेत असतो. तर त्याच्या समोरच्या बाजूला एक बिबट्या त्याची
शिकार करण्यासाठी थांबला असतो. यावेळी काही सेकेंद ससा आणि बिबट्या एकमेकांकडे
पाहतात. यानंतर सशाला काही कळण्याच्या आतच बिबट्या त्याची शिकार करण्यासाठी झेप
घेतो.
तर ससा हा आपल्या चपळाईने जीव वाचवत बिबट्याला चकवा देत गायब होतो.
यामुळे बिबट्याला सशाची शिकार करता येत नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत
आहे.
व्हिडीओ
व्हायरल
विशेष म्हणजे हा ससा एवढा हुशार होता की त्याला बिबट्याने झेप
घेतल्याचे कळताच त्याने बिबट्यापेक्षा मोठी झेप घेतली. यानंतर बिबट्याने सशाला
पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. पण सशाने वेगात धूम ठोकली. या सर्व गोष्टींमुळे
बिबट्या मात्र उपाशी राहिला. त्याला हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने दु:खी व्हावं
लागले. सध्या नेटकरी हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे
0 टिप्पण्या