Ticker

6/Breaking/ticker-posts

शरद पवारांची मोदिना अशीही ट्क्कर ..!

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी कोरोना लस टोचून घेतली. काहीवेळापूर्वीच ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल झाले होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील रुग्णालयात आल्या आहेत.  याशिवाय, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर लगेच शरद पवार यानीही लस घेउन मोदिना ट्क्कर दिली अशी गमतीने चर्चा रंगली.  

 

 कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस दिली जातेय. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.

 

कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती कमी होणार?

जे.जे. रुग्णालयात पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लसीच्या सुरक्षिततेतविषयी खात्री नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेत लस टोचून घेतली होती. मात्र, त्यानंतरही रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर ठिकाणचे कर्मचारी कोव्हॅक्सिन लस घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे जे.जे. रुग्णालयातील कोरोना लसीकरण मोहीम संथ गतीने सुरु होती. मात्र, आता शरद पवार यांनी जे.जे. रुग्णालयात येऊन कोरोना लस घेतल्याचे लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील लसीकरण मोहीम वेग पकडू शकते.

कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?

कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल. सध्या सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही. कोव्हिड योद्धे, हायरिस्क कॉन्टॅक्टमधील कर्मचारी, आणि आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या