*अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णांच्या
संख्येत वाढ
*करोनाच्या पार्श्वभूमीवर शनैश्वर
देवस्थानचा मोठा निर्णय
*शुक्रवार, शनिवार शनिमंदिर बंद राहणार
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शिंगणापूर येथे शनी अमावस्याला देशभरातून
लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सध्या करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारीचा
उपाय म्हणून शनिअमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी
दुपारी तीन वाजता शनी मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. शनिवारी देखील दिवसभर दर्शन
बंद राहिल. रविवारी (१४ मार्च) दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू होईल.
नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा
यांनी शनिवारी जमावबंदी लागू केली आहे. ग्रामस्थांनी व भाविकांनी आदेशाचे पालन
करण्याचे आवाहन सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी केले आहे.
0 टिप्पण्या