Ticker

6/Breaking/ticker-posts

चारा छावण्यांच्या थकीत अनुदानासाठी आमदार राजळे यांचे महसुलमंत्र्यांना साकडे...




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

  पाथर्डी:- राज्य सरकार मार्फत सन २०१८-१९ मध्ये दुष्काळात जनावरांच्या शासन अनुदानीत चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यातील पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील ५२ चारा छावण्यांचे सप्टेंबर २०१९ महिन्यातील ४ कोटी २१ लाख   रु. अनुदान थकीत असून ते तातडीने देण्यात यावेत अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे निवेद्वानाद्वारे केली आहे.

            याबाबत आमदार राजळे यांनी याबाबत  संबधित मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीखरीप हंगाम २०१८-१९ मध्ये अहमदनगर जिल्हयात दुष्काळी भागात जनावरांसाठी राज्य सरकारने स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अनुदानीत चारा छावण्या सुरु केल्या होत्या.  चारा छावण्यांचे सप्टेंबर, ऑक्टोबर २०१९ या दोन महिन्याच्या कालावधीतील अहमदनगर जिल्हयातील १३ कोटी २९ लाख ९३ हजार २०३ रु. अनुदान देणे बाकी असून यामध्ये माझ्या शेवगांव-पाथर्डी मतदारसंघातील शेवगांव तालुक्यातील २३ चारा छावण्यांचे रु. २ कोटी ११ लाख व पाथर्डी तालुक्यातील २९ चारा छावण्यांचे रु. २ कोटी १० लाख   अनुदान मिळणे बाकी आहे. सदर छावणी चालकांनी  वरील कालावधीतील थकीत  अनुदान वारंवार मागणी करुनही अद्याप मिळाले नसल्याने छावणी चालक आर्थिक संकटात सापडलेले आहेत.

काही चारा छावणी चालकांनी लाखो रुपये ऊसनवार घेऊन तसेच ऊधारीवर चारा खरेदीपशुखाद्य व इतर साहित्य घेतलेले आहे. मात्र शासन अनुदान न मिळाल्याने ऊधारी देणे बाकी असल्याने छावणी चालकांची आर्थिक कोंडी झाली असून स्वयंसेवी संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. चारा छावण्यांचे थकीत अनुदान मिळण्यासाठी यापूर्वी जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे वेळोवेळी मागणी करुन पाठपुरावा केलेला असूनही अनुदान मिळणे अद्याप बाकी आहे. तरी  आपण या प्रश्नात लक्ष  घालून चारा छावण्यांचे राहिलेले अनुदान तातडीने मिळावेयासाठी तातडीने कार्यवाही करावीव छावणी चालकांना न्याय द्यावा अशी मागणीही आमदार राजळे यांनी संबधीत मंत्र्यांकडे केली आहे.  

गेल्या  दीड वर्षापासून चारा छावण्यांच्या थकीत अनुदानाचा प्रश्न तातडीने मार्गी लागल्यास पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील चारा छावणी चालकांची आर्थिक कोंडी दूर होवून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  तसेच आमदार राजळे यांनी या प्रलंबित प्रश्नात वरिष्ठ पातळीवर लक्ष वेधल्याने  छावणी चालकांतून समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या