लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जेऊर- विरोधकांवर टिका टिपण्णी करून राजकारण करण्याचे
दिवस गेले असून सध्या नागरिकांचे प्रश्न सोडवावेच लागतात असे प्रतिपादन ऊर्जा
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते नगर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन
करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना तनपुरे यांनी विरोधकांवर टिका टिपण्णी करून
राजकारण करण्याचे दिवस निघून गेले असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार कर्डिले
यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर ही टीका केली.
इथून मागे झाले ते झाले यापुढे विकास कामांच्या
दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
नगर औरंगाबाद महामार्ग ते पिंपळगाव उज्जैनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबद्दल
त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अभियंत्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट
केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला
असून सुमारे सहा ते सात महिन्यातच रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत.
नविन विज धोरणा नुसार शेतक-यांना ६०ते ७०
टक्के वीजबिलात सवलत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा फायदा घेऊन वीज बिल
भरण्यास सहकार्य करावे. सद्यस्थितीत रोहित्र ओव्हरलोड असून त्याबाबत नवीन रोहित्र
देण्यासाठी परिसराचा आराखडा तयार करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना
पूर्ण दाबाने वीज मिळेल तसेच कोणत्याही विकास कामांमध्ये ठेकेदारांनी मला
भेटण्याची गरज नाही फक्त कामाचा दर्जा चांगला द्यावा अशी सक्त ताकीद नामदार तनपुरे
यांनी दिली.
नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास
कामांचे उद्घाटन करण्यात आले. ३० ५४ लेखाशीर्ष अंतर्गत राज्य मार्ग ५ ते बहिरवाडी
रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, डोंगरी विकास
कार्यक्रमातून पिंपळगाव उज्जैनी ते दत्तवाडी रस्ता खडीकरण तसेच पिंपळगाव उज्जैनी
ते येरमाळा माळ्याची वस्ती रस्ता खडीकरण, पोखर्डी येथे नवीन
रोहित्रा चे उद्घाटन, २५ १५ लेखाशिर्ष अंतर्गत नागरदेवळा
येथील आलमगीर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण आदि विकास कामांचा भूमिपूजन समारंभ
संपन्न झाला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे, अर्थ
व बांधकाम समितीचे माजी सभापती रघुनाथ झिने, बहिरवाडी माजी
सरपंच विलास काळे, राष्ट्रवादी नगर तालुका अध्यक्ष उद्धवराव
दुसुंगे, रोहीदास कर्डिले, केशव बेरड,
प्राध्यापक सिताराम काकडे, इमामपुर सरपंच
भिमराज मोकाटे, रामदास आठवले यांच्यासह विविध खात्याचे
अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या