लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगांव : - तालुक्यातील वरुर येथे कोरोना संसर्गामुळे गेले १८ दिवसांत २ जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली असून कोरोनाचा वेगाने फैलाव होऊ लागल्याने ग्रामस्थांनी गांव बंदचा निर्णय घेतला आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की .वरुरला १८ दिवसानंतर कोरोनाचा दुसरा बळी. नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ५० वर्षीय विवाहितेची प्राणज्योत मालवली. वरुरला ॲक्टिव ७ रुग्ण.तर, चौघांची कोरोनावर मात केली आहे . कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने ' 'गाव बंद ' चा निर्णय घेतला आहे .
वरुर ग्रामपंचायतीने तातडीने गांव बंदचा निर्णय जाहिर करून उपाय योजना सुरु केल्या आहेत . हायस्कूल, प्राथमिक शाळा, सार्वजनिक वाचनालय या आस्थापना पूर्णपणे बंद. ठेवण्यात आल्या असून किराणा, भाजीपाला विक्रीसाठी ठराविक वेळ देण्यात आली आहे . तालुका प्रशासनाने आरोग्य विषय सुविधा त्वरेने उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .
0 टिप्पण्या