Ticker

6/Breaking/ticker-posts

'इस बार तो बच गए ' लग्न आणि बार टारगेट ..! ...

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:  वाढीचा वेग नगर जिल्हयात तिप्पट झाल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून जेथे मोक्कार गर्दी वाढत आहे त्यावर त्वरीत काबू पाण्याची गरज असल्याचा निष्कर्ष मुख्यमंत्र्यांशी झालेल्या ऑन लाईन चर्चेतून समोर आला आहे . 

त्यामुळे भरमसाठ गर्दीचे लग्न समारंभ आणि रेस्टॉरंट बिअर बार हेच मुख्य टाररगेट ठराविण्यात आले आहेत . परंतु या सर्व उपद्व्यापी मंडळी मुळे सर्वसामान्य माणूस वेठीला धरला जाऊ नये या भावनेतून मुख्यमंत्र्यांनी या बाबीचा प्राधान्याने विचार केल्याने सर्वसामान्य नगरकर सध्या काही दिवसा करिता तरी अनावश्यक लॉक डाऊनच्या जाचातून तूर्त तरी सूटला आहे . मात्र प्रशासनाने सुद्धा जे नियम ठरतील त्यात कोणतीही 'तडजोड' करू नये ही आम जनतेची रास्त अपेक्षा आहे .

अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही मात्र त्यावर वेळीच पायबंध घाला असे आदेशच ना . ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत . प्रत्येकाने स्वतः सह कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या