Ticker

6/Breaking/ticker-posts

असाही विक्रम ! पुण्यात तीन तासांत तयार झाली ७ टनांची महामिसळ..!

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पुणे:-प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारातून पुण्यात रविवारी तब्बल सात टन  महामिसळ तयार करण्यात आली. तीन तासांत ३०० स्वयंसेवी संस्थांमार्फत ही मिसळ ३० हजार गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आली. जगात पहिल्यांदाच सुर्यदत्ताच्या वतीने 'अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ तयार करण्यात आल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.

शेफ विष्णू मनोहर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही महामिसळ तयार करण्यात आली. सूर्यदत्ताचे संस्थापक प्रा. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, प्रा. शैलेश कुलकर्णी, सचिन ईटकर, प्रा. सुनील धाडिवाल, प्रा. प्रतीक्षा वाबळे, प्रा. शेफाली जोशी, समीरा नाईक, प्रा. अजित शिंदे, नयना गोडांबे, प्रा. मंदार दिवाणे आदी उपस्थित होते.

रविवारी पहाटे दोन ते सकाळी नऊ या सात तासांच्या वेळेत ही मिसळ तयार करण्यात आली, तर सकाळी नऊ ते दुपारी १२ या तीन तासांच्या वेळेत त्याचे वाटप झाले. या महामिसळीसाठी दीड हजार किलो मटकी, ५०० किलो कांदा, १२५ किलो आले, १२५ किलो लसूण, ४०० किलो तेल, १८० किलो कांदा-लसूण मसाला, ५० किलो मिरची पावडर, ५० किलो हळद, २५ किलो मीठ, ११५ किलो खोबरे, १५ किलो तेज पान, १२०० किलो मिक्स फरसाण, ४५०० लिटर पाणी, ५० किलो कोथिंबीर वापरण्यात आली. त्यासाठी ३३ बाय २२चे चुल्हण, १० बाय १० व ७ बाय ७ साइजची कढई वापरण्यात आली. विश्वविक्रमाची नोंद होण्यासाठी जगातील सर्व बुक ऑफ रेकॉर्ड्‌‌सकडे या विक्रमाची माहिती पाठवली जाणार आहे.
' पुणेरी मिसळ पुण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे महामिसळ तयार करून विश्वविक्रम करावा; यातून गरजूंना अन्नदान करावे, असे ठरवले,' असे संजय चोरडिया म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या