लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी:- कोरोनाने पुन्हा एकदा डोके वरती काढले असून
राज्यात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.नियमांचे पालन करता सर्रासपणे आपला व इतरांचा जीव धोक्यात
घालून नागरिक बिना मास्क फिरतांना दिसत आहे.त्यामुळे पाथर्डीत आज सकाळ्पासुनच दंडात्मक कारवाईचा पवित्रा
तालुका प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हाधिकारी
राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने सयुक्त
पणे विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरूवात केली. प्रांताधिकारी
देवदत्त केकाण ,तहसीलदार
शाम वाडकर,आरोग्याधिकारी डॉ भगवान दराडे,पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी मागील
महिन्यात सर्व व्यापारी वर्गाची बैठक बोलावून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहत काही सूचना करून आदेशाचे पालन करण्याचे सूचित केले होते.
त्याअनुषंगाने कारवाईला सुरवात केली आहे.
बुधवारी शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच बाजारपेठेत
कारवाई ला सुरूवात करत व काही प्रमाणात समज देत व पुढे नियमित पणे कारवाई होणार
आहे. तरी तालुका प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे नागरिकांनी व व्यापारी, वर्गाने
पालन करावे व कारवाई टाळावी असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासकीय
अधिकारी अय्युब सय्यद व सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड यांच्या पथकाने केले .मंगल कार्यालय, हॉटेल्स व गर्दी होणारे
ठिकाणांची ही तपासणी होणार असुन नियमांच उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई
होणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
0 टिप्पण्या