Ticker

6/Breaking/ticker-posts

'बाळबोध' लिलांपुढे पोलिस हतबल .. Forgetting ' पासवर्ड' !

 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याच्याकडून माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून हवी तशी माहिती त्याने पोलिसांना दिली नसल्याचेही पुढे आले आहे. दरम्यान, तपासाचा मुख्य भाग  आयफोन, परंतू तो मोबाईलचा 'पासवर्ड'च आठवत नसल्याचे सांगतोय .

या घटनेमध्ये हैदराबाद येथील आश्रय देणाऱ्या व ताब्यात घेतलेल्या वकिलाला साहाय्य करणारी एक महिला फरार असून तिला चौकशीसाठीची नोटीस पोलिसांनी बजावली आहे, तर बोठे याच्याकडे असलेला त्याचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला होता त्याची तपासण्याची मोहीम सुरू करणयात आली आहे. तो मोबाईल उघडल्यानंतर काय काय माहिती मिळते यावरून अनेकांचे दणाणले आहेत. रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केल्यानंतर त्याच्या समवेत आणखी तीन जणांना अटक केली आहे. बोठे ज्या ठिकाणी हैदराबाद मध्ये राहिला, तेथे आधार देणारा वकील जनार्दन अकोला यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या सोबत असलेली एक महिलाही त्याची मदतनीस असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून तिलाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे व चौकशीसाठी तिलाही ताब्यात घेतले जाणार आहे.

आरोपी बोठेला अटक केल्यानंतर त्याला येत्या २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. त्याने रेखा जरे यांचा खून कशासाठी केला हे उघड व्हायचे आहे. पोलिसांनी बोठेच्या घरातून आयफोन हस्तगत केलेला आहे. बोठे याला अटक झाल्यानंतर आता तो फोन उघडला जाणार आहे. त्याची तयारी सुद्धा पोलिसांनी सुरू केलेली आहे. मात्र मोबाईल उघडण्यासाठी ' पासवर्ड ' आठवत नसल्याचा बहाणा बोठे करीत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी बोठे यांच्याकडून अन्य माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र तो सर्वच माहिती द्यायला तयार नाही, असेही पुढे आले आहे. बोठे याचा साथीदार तनपुरे याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. जेव्हापासून बोठे फरार आहे तेव्हांपासून त्याच्या घरच्या संपर्कामध्ये तनपुरे याच्यामार्फत तो राहत होता. त्यामुळे तनपुरेचा मोबाईल सुद्धा पोलिसांनी हस्तगत करून तो कशा पद्धतीने त्यांच्याशी संपर्क करायचा याची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे त्याने काही पैशाचे व्यवहार केले आहेत का? जर केले असतील तर कोणामार्फत केले आहेत, याची माहिती घेतली जात आहे. विशेष म्हणजे हैदराबादमध्ये ज्या ठिकाणी बोठे याने मोबाईल वापरला, त्याचे सीमकार्ड सुद्धा कुठून व कसे घेतले त्याची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत बोठेने कुठे कुठे वास्तव्य केले, त्याला तेव्हा कुणी - कुणी मदत केली याचीही माहिती घेतली जात आहे. एकणच काय तर बाळच्या 'बाळबोध लिला' पोलिसांना  डोंगराएवढ्या भासू लागल्या आहेत . बघूया त्यातून काय - कसे निष्कर्ष पुढे येतात ते ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या