Ticker

6/Breaking/ticker-posts

बोठेला पकडण्यात जामखेड पोलिसांची कामगिरी., पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा सन्मान..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 जामखेड :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यास नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून जेरबंद केले आहे . यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली. या पथकात जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच हेड कॉन्स्टेबल अविनाश ढेरे,संग्राम जाधव ,व चालक हनुमंत अडसूळ आदीचा समावेश होता .

 गेल्या ३ महिन्यापूर्वी जामखेड पोलीस ठाणे येथे रुजू झालेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आल्यापासून कामाची चुणूक दाखवली होती. अनेक जुन्या  गुन्ह्याची उकल त्यामध्ये गुन्ह्यात पाहिजे असलेले केली.पिस्टल , अफू  ची शेती, अवैध हातभट्टी उद्वस्त केल्या तसेच जामखेड मध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावला आहे. ४९ ग्रामपंचायत च्या निवडणुका शांततेत पार पाडल्या  या कामगिरीची दखल जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी घेतली होती. महत्वाच्या खुनाच्या  गुन्ह्यातील रेखा जरे  हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे  याला पकडण्यासाठी सहा टीम करण्यात आल्या होत्या या सहा टीम मध्ये जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे महत्वाची जबाबदारी पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली होती.बोठेला अटक करण्यात जामखेड पोलिसांची भूमिका महत्वाची होती. यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

    बाळ बोठेला पकडण्यासाठी जामखेडचे पोलीस निरीक्षक १२ मार्चला रवाना झाले होते. तेथे दोन दिवस तेलंगना मधील हैद्राबाद मधील  बिलालनगर मध्ये सर्च ऑपरेशन सरू केले. त्या सर्च ऑपरेशन मध्ये बोठे  तेथील एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजले. त्यानुसार या टीम ने सकाळी सहा वाजण्याच्या सुमारात धाड टाकत बोठेला अटक करण्यात यश आले.बोठे ला अटक झाल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या कामगिरीबद्दल अहमदनगर पोलीस प्रशासनाचे कौतुक केले आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या