*आज ४४९ रूग्णांना डिस्चार्ज तर ६४३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६३ टक्के
* घाबरून जाऊ नये, मात्र प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: -जिल्ह्यात आज ४४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९ हजार ३३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.६३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३१४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०३ आणि अँटीजेन चाचणीत ८८ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५३, अकोले ०३, जामखेड ०९, कोपरगाव ३१, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी १४, संगमनेर ०४, शेवगाव २१, श्रीगोंदा ०३, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२३, अकोले ०८, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव १७, नगर ग्रामीण २५, नेवासा १३, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहाता ६०, राहुरी २०, संगमनेर ३७, शेवगाव १०, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ४४, कॅन्टोन्मेंट ०२, इतर जिल्हा २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ८८ जण बाधित आढळुन आले. मनपा १९, जामखेड ०५, कर्जत ०३, नगर ग्रामीण १०, नेवासा १२, पाथर्डी २०, राहाता ०२, राहुरी ०४, संगमनेर ०२, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा १५६, अकोले ०५, जामखेड ०६, कोपर गाव ४५, नगर ग्रामीण १६, नेवासा ११, पारनेर २३, पाथर्डी १६, राहाता ४७, राहुरी १५, संगमनेर ५३, शेवगाव १७, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:७९३३५*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३३१४*
*मृत्यू:११८४*
*एकूण रूग्ण संख्या:८३८३३*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
0 टिप्पण्या