Ticker

6/Breaking/ticker-posts

अन्यथा महावितरण कार्यालयातच दशक्रिया विधी – कोकाटे

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नगर  :-  नगर तालुक्यातील आठवड येथील शेतकरी नानासाहेब मोरे यांचा दिनांक ६ रोजी विद्युत वहिनीची तार अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. सदर शेतकरी कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा . अन्यथा मयत शेतकऱ्याचा दशक्रिया विधीच महावितरण कार्यालयात करू असा इशारा निवेदन द्वारे भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन. एम. धर्माधिकारी यांना दिले.

 कोकाटे यांनी निवेदनात म्हटले की, महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे एवढी मोठी दुर्दैवी घटना घडून एक शेतकरी कुटुंब उध्वस्त झाले . असे असताना देखील अद्यापपर्यंत महावितरण विभागामार्फत कुठल्याही प्रकारची दखल या घटनेबाबत घेतलेली दिसत नाही . ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज त्याच मयत शेतकऱ्याचे जर वीजबील थकीत असते तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या घरी वीजबिल वसुलीसाठी, वीजपुरवठा खंडित करण्यासाठी भरमसाठ चकरा मारल्या असत्या . आज त्याच शेतकऱ्याचा महावितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू झाला आहे . तरीही एकाही अधिकाऱ्यांला त्या शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेळ नाही. सदर विभागाचा कोणताही अधिकारी तसेच कर्मचारी या घटनेना गंभीरपणे घेत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे .

        मयत शेतकऱ्याचा दशक्रिया विधी होण्यापूर्वी त्या शेतकरी कुटुंबाला तरतुदीनुसार आर्थिक मदत करावी व सदर घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी . अन्यथा भाजपा नगर तालुका आठवड ग्रामस्थांच्या समवेत महावितरण कार्यालयातच दशक्रिया विधी करेल असा इशारा या वेळी कोकाटे यांनी दिला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या