Ticker

6/Breaking/ticker-posts

नुकसान भरपाई श्रेयावरुन शेवगाव- पाथर्डीतील राजकरण्यात रंगला कलगी तुरा..!


 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

शेवगाव:-दोन दिवसांपूर्वी शेवगाव तहसीलदार यांनी तालुक्यातील एका महसूल मंडळाचे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान रक्कम जमा केली आहे. यावर लगेच आमदार मोनिका राजळे व सभापती डॉ क्षितिज घुले  यांनी अनुुुुदान रक्कम आमच्या पाठपुराव्यामुळेच शेतक-यांच्या पदरात मिळाली असे दावे-प्रतिदावे सुरु केल्यामुळे शेतकर्यानाही नेमके अनुदान कोणामुळे मिळाले हे कळायला तयार नाही.

 दरम्यान शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील जवळपास सर्वच गावात  जुन ते सप्टेंबर २०२० मध्ये अतिवृष्टी झाली. खरीपाच्या कपाशी, बाजरी, तुर,सोयाबीन, मुग या मुख्य पिकाबरोबर चारा पिके सडुन गेली. अहमदनगर जिल्ह्यात पावसाने सर्वाधिक नुकसान शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील गावात झालेले आहे. याची शासकीय नोंद आहे. अशा परिस्थितीत नुकसान होत असताना नागरीकांनी वारंवार मागणी करूनही प्रशासकीय महसूल कर्मचारी शासकीय आदेश नसल्याने पंचनामे करत नव्हते. याचा विचार करून जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले व शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे पहिले माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले कि शेवगाव -पाथर्डी तालुका अतिवृष्टीचा सर्वाधिक बळी ठरलेला आहे. यावर तातडीने पालकमंत्री यांचा नुकसान पाहणी दौरा आखण्यात आला व तारीख जाहीर करण्यात आली.

  आमदार मोनिका राजळे यांनी पालकमंत्री दौ-यावर येणार त्याच्या आदल्या दिवशी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील एक एक गावातील नुकसानग्रस्त भागाचा कार्यकर्ते समवेत पाहणी दौरा केला व प्रशासनाला पंचनामे करण्यास भाग पाडू असे दौ-यादरम्यान सांगितले. याच्या दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री यांचा बोधेगाव व इतर ठिकाणी नुकसान पाहणी दौरा केला व चालू दौ-यादरम्यानच वेगाने पंचनामे करण्यास व शेतक-यांना झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई दिवाळी पुर्वी देण्याचे आश्वासन दिले. हा दौरा घडवून आणण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले व शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले ,अॅड.  प्रतापराव ढाकणे. आदिनी प्रयत्न केले. व जास्तीत जास्त नुकसान भरपाई रक्कम देण्यासाठी आग्रह धरला होता.

दरम्यान नुकसानग्रस्त गावे जास्त असल्याने रक्कमही मोठी असल्याने आर्थिक नियोजनाचा अंदाज घेऊन भरपाई दोन टप्प्यात देण्याचे जाहीर करून लगोलग पहिल्या टप्प्याची रक्कम वितरित करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील गावांना मात्र चार महिने उलटुनही प्रतिक्षाच होती. या दरम्यानच्या काळात लोकप्रतिनिधी व विरोधक मोनिका राजळे यांच्या कडे अनुदान मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातुन सतत होत होती यावर कोरोना प्रतिबंध काळात कुठले दखलपात्र आंदोलन झाले ना धरणे केवळ कागदी घोडे नाचवले गेले. असा दावा घुले- ढाकणे समर्थकानी केला आहे.  वास्तविक सत्ताधारी पक्षाचे असल्याने निदान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे प्रत्यक्ष मागणी सतत चालू होती. शेवटी अनुदान रक्कम सत्ताधारी पक्षानेच मंजूर केले असल्याचे दिसून येते. मात्र रंगलेल्या श्रेयवादामुळे शेतकर्यांसह नागरीकांची चांगलीच करमणूक होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या