Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा मोर्चा



 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर-;बँकेच्या खासगीकरणा विरोधात बँक कर्मचाऱ्यांची शिखर संघटना UFBU ने दि १५ व १६ मार्च २०२१ रोजी संपाची हाक दिली आहे. त्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी आज दि. १५ मार्च २०२१:रोजी नगर येथे नगर शहर व इतर  तालुक्यातील सर्व बँक कर्मचारी एकत्रित आले होते. M G रोड, कापड बाजार  येथे कुठलीही घोषणाबाजी न करता  शिस्तबद्धपणा हे या निदर्शनांचे ठळक वैशिष्ट होते. AIBOC चे महाराष्ट्र समिती सदस्य अच्युत देशमुख  यांनी सरकारचे जर या संपाने भान ठिकाणावर येणार नसेल, तर भविष्यात बेमुदत संप करून आणखी जोरदार खासगीकरणाचा विरोध करण्यात येईल, असे सांगितले. 

 या निदर्शनासाठी प्रशांत चव्हाण, अभिजीत जोशी, राज्य समिती सदस्य, तसेच सचिन क्षीरसागर, किरण शिंदे , गजानन चांदूरकर, राहुल देवकर, सुहास पुंड आदी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. ताराचंद ढेरे यांनी सूत्रसंचालन केले, तर अमोल जाधव यांनी आभार मांडले. तसेच उद्या दि. १६ मार्च रोजी सकाळी 10 वाजता दिल्ली गेट  येथे सरकारचा निषेध नोंदवण्यात येईल असे श्री. अच्युत देशमुख यांनी जाहीर केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या