लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
इस्लाबामाद : पाकिस्तानात
कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. पाकिस्तानात कोरोनाची
तिसरी लाट आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाची लस टोचून घेतली.
पाकिस्तानात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णवाढीचा दर तब्बल 7.8
टक्क्यावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात
पाकिस्तानात 61 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत
मृतांचा आकडा 13 हजार 717 वर पोहोचला
आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 24,592 इतकी आहे.
पाकिस्तानात
कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळे रुग्णालयांवर मोठा भार पडला आहे. बेड आणि
रुग्णसंख्या यांचं गणित जुळवताना पाक प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे.
इम्रान खान यांनी कोणती लस घेतली?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनची कोरोना लस सिनोफार्म
टोचून घेतली. पाकिस्तान हे लसीसाठी चीनवर अवलंबून आहे. लाहोरमधील तीन मोठ्या
रुग्णालयातील कोरोना लस संपली आहे. इथे लसींचा तुटवडा जाणवत आहे. यावरुन
पाकिस्तानात रुग्णसंख्या किती वाढली आहे, याचा अंदाज येऊ
शकतो. लस घेण्यासाठी बहुसंख्य लोक येत आहेत. मेयो हॉस्पिटल, सर्विसेज
हॉस्पिटल आणि जिन्ना हॉस्पिटलमधील लस संपल्या आहेत. धक्कादायक म्हणजे आरोग्य
कर्मचाऱ्यांना देण्यासाठीही लस उपलब्ध नाही.
पाकिस्तान
हे कोरोना लसीसाठी चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानात कोरोना लस निर्मित होत नाही.
त्यामुळे चीन लस पाठवली तरच पाकिस्तानात लसीकरण होतं. लवकरच चीनकडून सिनोफार्म
लसीची (Sinopharm Vaccine) खेप पाकिस्तानला मिळेल असा विश्वास
पाकिस्तानमधील रुग्णालय प्रशासनाला आहे.
दरम्यान, पाकिस्तानला चीनशिवाय जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) कोवॅक्स
Covax) ही लसही मिळण्याची आशा आहे. Who कडून गरिब आणि कमी उत्पन्न
असलेल्या राष्ट्रांना ही लस पुरवण्यात येत आहे. यानुसार पाकिस्तानला 1 कोटी 71 लाख 60 हजार डोस
मिळणार आहेत. सध्या पाकिस्तानातही 60 वर्षावरील ज्येष्ठ
नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.
0 टिप्पण्या