लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: – भाजप शिवसेनेचे आमदार म्हणून अनिल राठोड यांनी नगर शहरासह जिल्ह्यात मोठे काम केले. हिंदूत्वाचे मोठे प्रचारक म्हणून ते कार्यरत होते. जिल्ह्यात हिंदूत्व रुजविण्याचे काम त्यांनी केले. शिवसेना भाजपाची युती असल्याने या युतीच्या माध्यमातून महानगरपालिका तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनिल राठोड यांच्या सहकार्याने सत्ता मिळविता आल्या. भैय्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली, त्याचा उपयोग नेहमीच युतीसाठी, हिंदूत्वासाठी झाला. सर्वसामान्यांमध्येभाजप सेनेविषयी जो विश्वास निर्माण केला आहे तो प्रत्येकाच्या मनात आजही आहे. त्याचेकार्य कोणीही विसरु शकत नाही, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अॅड.अभय
आगरकर यांनी केले.
0 टिप्पण्या