Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजपने केलेल्या कामाचे श्रेय रोहित पवार यांनी लाटू नये – खा. सुजय विखे पा.

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

जामखेड:- - आमदार रोहित पवार देखील आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्नकरत आहेत परंतु  जामखेडच्या जनतेला माहिती आहे कामे कोणी केली आहेत. कर्जत जामखेडचा खरा विकास माजी मंत्री राम शिंदे यांनीच केला आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात  फुकटचे  श्रेय घेणाऱ्याना आगामी  निवडणूकित जनताच त्यांची जागा दाखवून देईल असे मत खासदार सुजय विखे यांनी जामखेड येथील  पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीस बोलताना केले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद,जेष्ठ नेते जगन्नाथ राळेभात तालुका युवा मोर्च्याचे अध्यक्ष शरद कार्ले,रवी सुरवसे,मनोज कुलकर्णी,बाळासाहेब गोपाळघरेजिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात,जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरने,सरपंच बापूराव ढवळे, अंकुश शिंदे, सुधीर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी,सोमनाथ राळेभात,उदयसिंह पवार,अभिजित राळेभात,पांडुरंग उबाळे, शरद हजारे, मोहन गडदे,भागवत सुरवसे,धनराज गावडे,उद्धव हुलगुंडे आदीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 खासदार विखे म्हणाले कि, गेल्या काही दिवसांपूर्वी न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता हा पाठपुरावा करून केला आहे परंतु याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार पवार करत आहेत.  गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना विनासायास वीज पुरवठा पूर्ण दाबाने व अखंडित सुरु ठेवला होता. परंतु राज्यात हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही.तसेच विजेची देयके भरली नाही म्हणून राज्य सरकारने वीज बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना हे महाविकास आघाडी सरकार मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देत आहे. म्हणून शेतकरी या महाविकास आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही.

 तसेच  एम पी एस सी परीक्षे पुढे घेण्यावरून  या महाविकास आघाडी सरकार मध्ये एक मत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान मोठ्याप्रमाणात होत आहे. या वर्षीचा अर्थ संकल्पाला अर्थच राहिला नाही हजारो कोटीचे उड्डाणे असून पोकळ आश्वासनाच्या खैराती वाटत आहेत.तसेच महाविकास आघाडी मध्ये सरकार चालविण्याची क्षमता नसून त्यांना सरकार चालविणे जमत नसेलतर त्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी भाजपचे खासदार सुजय विखे यांनी जामखेड येथे केली.यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध झालेले संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार खासदार सुजय विखे यांच्या हसे करण्यात आला.तसेच भाजपयुमो तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांच्या संपर्क कार्यलयाचे देखील उदघाटन करण्यात आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या