लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पंढरपूर: महाविकासआघाडीचा प्रमुख आधारस्तंभ असलेले शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमधील कथित भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील चलबिचल
वाढली आहे. अशा परिस्थितीत आता भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी नवे वक्तव्य
करुन संभ्रम आणखीनच वाढवला आहे.
राम
शिंदे यांनी मंगळवारी पंढरपुरात ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांना अमित शाह आणि
शरद पवार यांच्या भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राम शिंदे यांनी,
‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण
सूचक प्रतिक्रिया दिली.
यावेळी
त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरही भाष्य केले. या
निवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज भाजपचे राज्यातील बडे नेते पंढरपुरात येणार आहेत.
पंढरपूरची पोटनिवडणूक म्हणजे ठाकरे सरकारसाठी लिटमस टेस्ट असेल, असे वक्तव्य राम शिंदे यांनी केले.
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन
राष्ट्रवादी
काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे
रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या
तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या
प्रकृतीसाठी प्रार्थना केली. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार
यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी
ट्विटमध्ये म्हटले आहे.
मी शक्यता व्यक्त करण्याइतका मोठा नेता नाही: चंद्रकांत पाटील
यूपीएच्या
अध्यक्षपदावरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक
वादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. संजय राऊत हे
चंद्र, सूर्य किंवा मंगळ अशा कोणत्याही विषयावर भाष्य करु
शकतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी
चंद्रकांत पाटील यांनी कालप्रमाणे शरद पवार आणि अमित शाह भेटीवर भाष्य करण्यास
नकार दिला. तशा गोष्टी घडल्याच तर तुम्हाला आधी कळेल, असे मी बोललो होता. परंतु, कोणत्याही शक्यता व्यक्त
करण्याइतका मी मोठा माणूस नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी
म्हटले.
0 टिप्पण्या