लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्लीः देशात करोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह
रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. आणि महाराष्ट्रातील ९ जिल्हे हे देशातील करोनाच्या
टॉप १० मध्ये आहेत. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,
जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. तर टॉप १० मध्ये
कर्नाटकातील बेंगळुरूचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य सचिव
राजेश भूषण यांनी दिली.
देशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. खासकरून महाराष्ट्र आणि पंजाबमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने मोठी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात तर करोनाचे दोन नवीन प्रकार समोर आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.
देशात सर्वाधिक चिंता महाराष्ट्र आणि पंजाबने वाढवली आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २८ हजारांवर नवीन रुग्ण आढळले आहेत. तर पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या संख्येने नवीन रुग्ण आढळल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.
महाराष्ट्र आणि पंजाबशिवाय गुजरात आणि मध्य
प्रदेशातही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. गुजरातमध्ये १७०० आणि मध्य प्रदेशात १५०० हून
अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद, बडोदा, राजकोट आणि भावनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन रुग्ण आढळत आहेत. तर मध्य
प्रदेशात भोपाळ, इंदूर, जबलपूर,
उज्जैन आणि बैतुलमध्य नवीन रुग्ण आढळून येत असल्याचं आरोग्य सचिव
म्हणाले.
देशात करोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आणि सर्वाधिक
अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. आणि महाराष्ट्रातील ९ जिल्हे हे देशातील
करोनाच्या टॉप १० मध्ये आहेत. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,
जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे .
0 टिप्पण्या