लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर-सन २०२१ मध्ये मंत्रालय व सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात राष्ट्रपुरुष,थोर व्यक्तिंच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात १४ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक व थोर पुरूषांची यादी जाहीर केली. संत नामदेवांचे नाव महाराष्ट्र सरकारच्या थोर पुरुष व संताच्या यादीत नसणे हे आकलनीय आहे,शासनाने आपली चूक त्वरित सुधारून संत शिरोमणी नामदेव महाराजांचे नाव यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी समाजाच्या वतीनेे करण्यात आली आहे.
नामदेव महाराजांचे नाव नसल्याने वारकरी संप्रदायातील लाखो लोकांना आश्चर्य वाटले व दुःखही झाले. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी मराठी वाड्मयातील अनेक दालनांचा शुभारंभ केला.मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक,आद्य आत्मचरित्रकार,आद्य प्रवासवर्णनकार याशिवाय महाराष्ट्रीय हिंदी कवी,हिंदी भाषेचे आद्य प्रचारक आद्य व श्रेष्ठ किर्तनकार आद्य अस्प्रुश्योध्दारक व आद्य फडकरी म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराजांचा गौरव करण्यात आला होता.
त्याकाळी संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका दूर दूर पर्यंत भारतभर फिरवली.भागवत धर्म त्यांनी पंजाब,गुजरात,राजस्थानमध्ये नेला,रूजवला आणि जगवला.गुरुग्रंथसाहेब या शिखांच्या पवित्र ग्रंथात संत शिरोमणी नामदेव महाराजांची पदे समाविष्ट आहेत.संत नामदेव महाराज म्हणजे हिंदू आणि शिख यांना एकत्र जोडणारा दुवा आहे, संत नामदेव हे खर्या अर्थाने सर्व धर्म समभावाचे प्रतिक आहेत.त्यावेळी प्रतिकुल परिस्थितीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे काम करणाऱ्या संत नामदेवांचे नाव महाराष्ट्र सरकारच्या थोर पुरुष व संताच्या यादीत नसणे हे आकलनीय आहे.
शासनाने आपली चूक त्वरित सुधारून संत शिरोमणी नामदेव महाराजांचे नाव यादीत समाविष्ट करावे अशी मागणी श्री नामदेव विठ्ठल मंदिर ट्रस्ट,डावरे गल्ली अहमदनगर.नामदेव शिंपी समाजाचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, ब्राह्मण गल्ली भिंगार अहमदनगर. व श्री नामदेव शिंपी समाज ट्रस्ट, शिंदे मळा सावेडी,अहमदनगर.यांचे वतीने अप्पर जिल्हाधिकारी श्री सोरमोरे साहेब,अहमदनगर दक्षिणचे आमदार श्री संग्रामभैय्या अरूणकाका जगताप साहेब व अहमदनगर जिल्ह्याचे खासदार श्री सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना देण्यात आले,व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब व विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मेलद्वारे समाजाच्या वतीनेे करण्यात आली आहे. या वेळी डावरे गल्ली अहमदनगर शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी मांढरे , विश्वस्त श्री ज्ञानेश्वरजी कविटकर,श्री दिलीपजी गिते,भिंगार अहमदनगर शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री शैलेशजी धोकटे व शिंदे मळा सावेडी चे सचिव श्री राजेंद्रजी बगाडे उपस्थित होते.
0 टिप्पण्या