लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
सोनई :-माजी खासदार व जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आपल्या नगर येथील
निवासस्थानी कोरोना संसर्ग होवू नये याकरीताची लस आज घेतली आहे.
जेष्ठ नेते गडाख व त्यांच्या पत्नी शारदाताई यांनी लस घेतली.यावेळी
आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्याच्या
दुष्टीने सध्या लस देण्याची प्रक्रिया देशभर सुरु आहे. ही लस घेणे सर्वांसाठी
हिताचीच आहे.कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.सुरक्षित अंतर,मास्क व सॅनेटायझरचा वापर करुन
आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. असेही गडाख यांनी सांगितले.
0 टिप्पण्या