Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा सहकारी बँकेचा कारभार नेहमीच्या शिस्तीने करावा-ना.थोरात

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:-जिल्ह्याच्या विकासात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे योगदान असून या बँकेला मोठी परंपरा लाभलेली आहे. बॅंकेचे कामकाज  नेहमीच शिस्तीने चाललेले असून त्याच पद्धतीने नवीन पिढीचे संचालक मंडळ बँकेचा पुढील कारभार करतील आणि बँकेला आणखीन उज्वल घडवतील अशी अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी बँकेच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केली .

 बँक नेहमीच राजकारण विरहित कामकाज करत असून बँकेने आता सेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.असेही ना. थोरात यांनी सांगितले.या वेळी बोलताना  राज्याचे ऊर्जा व नगर विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, राज्यात मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी असून बँकेने वीज बिल भरण्यासाठी कर्जे योजना  शेतकऱ्यांसाठी राबवणे गरजेचे असून विज बिल थकित रकमेतून आलेल्या वसुली रकमेतून जिल्ह्यातील विजेसाठीच्या पायाभूत सुविधा साठी या रकमेचा वापर होणार असल्याची माहिती मंत्री श्री तनपुरे यांनी दिली.

 आपल्या अध्यक्षीय भाषणात बँकेचे अध्यक्ष श्री उदय शेळके यांनी बँकेचे विविध योजनांची माहिती देऊन बँक जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायटयांचे संगणकीकरण करणार असून ,जिल्ह्यातील सर्व सोसायट्यांचे संगणीकरण एकच प्रणालीद्वारे होणार असून त्यांचे डेटा सेंटर हे बँकेत असणार असल्याची माहिती श्री उदय शेळके यांनी दिली त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेच्या सर्व शाखा मधून शासनाचे डिजिटल सातबारे उतारे उपलब्ध करून देणार असल्याचेही माहिती श्री शेळके यांनी दिली.

 ऑनलाइन प्रणालीद्वारे बँकेचे संचालक श्री प्रशांत गायकवाड ,शंकरराव  काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री सुधाकर कोंडाजी रोहम, राजहंस दूध संघाचे श्री गायकर यांनीे सभेत भाग घेतला तर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक श्री सबाजी गायकवाड व श्रीरामपूर मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री सचिन गुजर यांनी सभेमध्ये प्रत्यक्ष मुद्दे मांडून भाग घेतला. बँकेच्या या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी ऑनलाइन पद्धत वापरण्यात आली.ऑनलाइन पद्धतीने जवळपास दोन हजार सभासद उपस्थिती होते. 

 बँकेचे उपाध्यक्ष श्री माधवराव कानवडे यांनी निधन झाले व सालात निधन झाले सर्व क्षेत्रातील व्यक्तीविषयी दुखवटा ठराव मांडला या नंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रावसाहेब वर्पे यांनी बँकेच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस वाचन केले याप्रसंगी बँकेचे संचालक आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार व माजी मंत्री श्री  शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार श्री भानुदास मुरकुटे श्री करण ससाने, श्री गणपतराव सांगळे ,श्री अमोल राळेभात, सौ आशाताई तापकीर याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब साळुंखे बँकेचे माजी संचालक श्री संपतराव म्ह, रावसाहेब शेळके, सबाजी गायकवाड ,श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री राजेंद्र नागवडे ,जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष श्री प्रतापराव शेळके, लेबर फेडरेशनचे संचालक श्री जयंत वाघ, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  श्रीमती दुसुंगे आदी मान्यवर उपस्थित होते. बँकेची ही ऑनलाइन सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. बँकेचे उपाध्यक्ष श्री माधवराव कानवडे यांनी  सर्व ऑनलाइन द्वारे व प्रत्यक्ष उपस्थित सभेतील सर्व मान्यवरांचे  आभार मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या