Ticker

6/Breaking/ticker-posts

गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार - औदुंबर उकिरडे

 मुख्याध्यापक संघाच्यावतीने  नूतन उपसंचालक औदुंबर उकिरडे यांचा सत्कार

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:पुणे विभाग शिक्षण उपसंचालकपदी नुकतीच औदुंबर उकिरडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हामाध्यमिक  उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ  पुष्पगुच्छ तसेच मुख्याध्यापक संघाचे मुखपत्र ज्ञानकलश हे मासिक देऊन सत्कार करण्यात आला.

     यावेळी सहाय्यक शिक्षण उपसंचालक मीनाताई सेंडकर,  शिक्षण अधिकारी रामदास हराळ,उपशिक्षणअधिकारी शिवाजी शिंदेवरिष्ठ सहाय्यक अरविंद मोरेशिक्षण उपनिरीक्षक सुनील वाळकेमुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र वाघपुणे विभागीय सदस्य प्राचार्य अशोक दोडकेप्राचार्य चंद्रकांत चौगुलेशिक्षक संघटनेचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास साठेसचिव श्री.दातेमुख्याध्यापक संघाचे महानगर अध्यक्ष ज्ञानदेव बेरडसचिव बाबासाहेब शिंदे,  प्राचार्या श्रीमती कांचन गावडेमुख्याध्यापिका श्रीमती पालवे सुनितामागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र पटेकरजिल्हा  अध्यक्ष शरद मेढेनाशिक विभाग सदस्य विलास साठेभास्कर रानडेदिलीप गवते,  संदीप बडेकरशिक्षकेतर संघटनेचे जयराम धांडे आदी उपस्थित होते.

यावेळी शिक्षण उपसंचालक माननीय औदुंबर उकिरडे यांना जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी लक्ष वेधलेजिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शाळाबाह्य सर्वेक्षण देण्यात आले असून सध्या   जिल्ह्यामध्ये  तालुका तालुक्यामध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये सापडत असल्यानेतसेचशिक्षकांना सध्या कोरोनाबाबतच्या सर्व सूचनांचे पालन करून विद्यालयांमध्ये उपस्थित राहून अध्यापनाचे काम करावे लागत आहेत्यामुळे शिक्षकांना ऑनलाइन  आपला हे दोन्ही प्रकारचे सध्या काम करावे लागत आहे. 10वी 12 वी विद्यार्थ्यांच्या  इतर सर्व वर्गाच्या सराव परीक्षा प्रॅक्टिकल हे कामे प्राधान्याने  करावीलागत  असल्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणास तूर्त स्थगिती मिळावी अशा प्रकारची मागणी श्री.उकिरडे यांच्याकडे करण्यात आलीत्याचप्रमाणे पवित्र प्रणालीचे काम अनेक दिवसांपासून बंद असून अनेक शाळेमध्ये अनेकविषयाला सध्या शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास   आणुन दिले.

 तसेच उच्च माध्यमिक विभागातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षक  शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्यासंदर्भात त्वरित कॅम्प लावण्यात यावा गेल्या महिन्यामध्ये उच्च माध्यमिक संच मान्यता चा कॅम्प लावण्यात आला होता परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही शाळेला संच मान्यतेची प्रत मिळाली नाही या  अशा प्रकारचे विविध प्रश् प्राचार्य  सुनील पंडित यांनी मांडले

      सत्काराला उत्तर देताना शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे म्हणालेजिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचा आपण प्रयत्न करुसध्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचा प्रश् महत्वाचा असून शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संचालकांची परवानगी घेऊन त्वरित शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण पुढे ढकलण्यात येईलतसेच प्रणाली मार्फत या शाळांनी यापूर्वी शिक्षक मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत त्यांना एप्रिल 2019  मध्ये राज्यातील सुमारे पाच हजार आठशे रिक्त जागेवर शिक्षक भरले जातीलआपल्या जिल्ह्यातील सर्वविनाअनुदानित उच्चमाध्यमिक विभागातील शिक्षक  शिक्षकेतर मान्यतेचे कॅम्प त्वरीत लावण्यात येईल असे सांगून आपल्यालासर्व मुख्याध्यापकशिक्षक यांना बरोबर   घेऊन जिल्ह्यातील गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे  आवाहन त्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या