लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जामखेड :-केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मेरा रेशन नावाने मोबाईल ॲप तयार केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना रेशन दुकानदार रेशन कार्ड संबंधित सर्व गोष्टी सुविधांची माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणार आहे.
तालुक्यातील
30 हजार 564 रेशन कार्डधारक असून
अंत्यदोय चे ५५६१ रेशनकार्ड आहे तर प्राधान्य कुटुंबाचे २५००३ एवढे रेशन कार्ड धारकांना या ॲपचा लाभ होणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांना घरबसल्या मिळावी तसेच पारदर्शकता राहावी
यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत .याच अनुषंगाने केंद्रशासनाने वन नेशन
वन रेशन कार्ड योजने नंतर मेरा रेशन हे ॲप तयार केले आहे. या ॲप मुळे रेशन
दुकानदारांच्या मनमानीला लगाम बसणार आहे.
प्ले स्टोअर
मधून हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती घरबसल्या
पाहता येईल. आपण राहत असलेल्या भागातील रेशन दुकान आपल्या नावावर किती धन्य आले
आहे. कोणते धन्य आले, मागील महिन्यात
किती नेले होते, याची
सर्व माहिती यात पाहता येणार आहे. त्यामुळे काही दुकानदारांच्या वितरणच्या अनियमिततेला लगाम बसणार आहे. तसेच या ॲप मुळे रेशन धारकांना
धान्य कमी मिळाले तसेच वेळेवर मिळाले नाही याबाबत तक्रार देखील नोंदवता येणार आहे.
रेशन
कार्डधारकांना रेशन कार्ड किंवा धन्य बाबत तक्रार करायची असल्यास त्यासाठी पुरवठा
विभाग किंवा तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. घरबसल्या तक्रार
नोंदविता येणार आहे. रेशन दुकानदार व
रेशन कार्ड धारकाला मिळालेले धान्य याची माहिती एका क्लिकवर मिळणार
आहे. यामुळे रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना किरकोळ कामासाठी तहसील
कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. या ॲप मुळे
रेशन धारकांना वेळेवर धान्य मिळण्यास मदत होणार आहे. मेरा रेशन ॲप्स मुळे लाभार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे.
0 टिप्पण्या