लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी:- अभय आव्हाड सामाजिक
प्रतिष्ठान व मैत्रेयी ग्रुपच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त कोरोना योद्धा
म्हणून काम करणाऱ्या महिला ग्रामसेविकांचा सन्मान करण्यात आला.बाबुजी आव्हाड महाविद्यालय
येथे आयोजित कार्याक्र्यामाच्या अध्यक्षस्थानी
विवेकानंद विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका
शीला फुंदे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून अनुजा कुलकर्णी,प्रा
वैशाली आहेर,आशा पालवे ,सुरेखा
बनसोडे,रेश्मा सातपुते,सारिका लाडे,मनोरमा कंठाळी आदी
उपस्थित होत्या.
यावेळी बोलतांना शीला फुंदे म्हणाल्या,सर्वच
क्षेत्रात महिला आज आघाडीवर काम करताना दिसत आहे.समाजाने नारी शक्तीचा आदर केला पाहिजे,गेली चौदा वर्ष महिला
दिन अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व मैत्रेयी ग्रुप साजरा करून महिलांना जगण्याची
पेरणा आणि नवं उमेद देत आहे.हा उपक्रम कौतुकास्पद आहे.प्रत्येक
गाव विकासात पुढे गेले तर देशात सकारात्मक बदल होण्यास वेळ लागणार नाही म्हणूनच
प्रत्येक महिला ग्रामसेवक यांनी आपण काम करत असलेले गाव हे आपले गाव समजून
गावाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे असे त्या शेवटी
म्हणाल्या. यावेळी आश्विनी कटके, अनुताई कटके, मनोरामा कंठाळी आदी ग्रामसेविकांनी मनोगत
व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रणिता
भावसार ,माया पवार ,सोनाली
घुले ,अश्विनी एडके आदींनी परिश्रम घेतले. प्रास्तविक सुरेखा चेमटे सूत्रसंचालन अर्चना
दराडे तर आभार शलाका ढाकणे यांनी मानले.
0 टिप्पण्या