लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर :-आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचलित आनंद पार्श्व प्रशालेत
सन 2020-2021 शैक्षणिक
वर्षात जागतिक महामारी कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग घेण्यात आल्याने अभ्यासावर कुठलाही
परिणाम झाला नाही. यास पालकांनी व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हे शक्य
झाले. ऑनलाईन वर्गात दररोज प्रार्थना, दैनंदिन अभ्यासक्रम,
वेळच्या वेळी परीक्षा घेण्यात आल्या. कंटाळवाणे अभ्यासक्रम न घेता
मुलांच्या मनस्थितीनुसार वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम घेण्यात आले.
प.पू. कुंदनऋषीजी म.सा. व प.पू. आलोकऋषीजी
म.सा. यांच्या आशीर्वादाने 2020-2021 शैक्षणिक वर्षात मुलांच्या अभ्यासावर परिणाम न करू देता ऑनलाईन वर्ग
घेण्यात आले. प्रशालेने घेतलेल्या ऑनलाईन स्नेहसंमेलनास मुलांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला.
प.पू. आलोकऋषीजी म.सा. यांचा आज वाढदिवस
असून, त्यांच्या
मार्गदर्शनाखाली केडगाव येथील आनंद गुरूकुलचे बांधकाम प्रगतिपथावर असून, ते लवकरच पूर्ण होईल. येथील पहिली ते सातवीपर्यंतची (सीबीएससी पॅटर्न)
प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. आनंद गुरूकुलचे पहिलीचे ऑनलाईन वर्ग शिक्षिका
मोनाली सूर्यवंशी यांनी सांभाळले.
ऑनलाईन स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन
प्राचार्या सौ. ज्योती पुरी यांनी केले. शाळेच्या शिक्षिका रेखा जेटला, शिल्पा देशमाने, कोमल
शहा यांनी योग्य मार्गदर्शन केले. शाळेचे विश्वस्त रमेश बाफना, मनोज शेटिया, मनोज बाफना, डॉ.
अशोक पगारिया, मेघा बोरा, सुनील बाफना
यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. 2021- 2022 या
शैक्षणिक वर्षातील प्रवेश सुरू करण्यात आले असून, अधिक
माहितीसाठी 8788283631 या नंबरवर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या