Ticker

6/Breaking/ticker-posts

मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, पत्नी विमल हिरेन

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 मुंबई: मनसुख हिरेन यांच्या मृत्यूंनंतर त्यांचे कुटुंबिय प्रथमचं माध्यमासमोर आलं आहे. मी आणि आमचा परिवार असं घडेल याचा विचार करु शकत नाही, असं मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन म्हणाल्या. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी झाली. वेळोवेळी पोलिसांचा फोन येत होता. तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. त्यांना पूर्ण दिवस बसवून ठेवले जायचे. माझ्या पतींनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले.  मनसुख हिरेन यांनी आत्मत्या केल्याच्या बातम्या आल्या मात्र, ते असं करु शकणार नाहीत. गुरुवारी कांदिवली क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचा फोन आल्यानं ते गेले होते, अशी माहिती मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यानी दिली.

 कांदिवली क्राईम ब्रँचमधून फोन आल्याचा दावा

मनसुख हिरेन पोलिसांना तपासात सहकार्य करत होते. गुरुवारी दिवसभर ते पोलीस स्टेशनला गेले होते.पोलिसांना ते तपासात सहकार्य करत होते. कांदिवली क्राईम ब्रँचमधून तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. घोडबंदर येथे बोलवण्यात आलं होतं तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर फोन बंद झाल्याची माहिती विमल हिरेन यांनी दिली. रात्रभर आम्ही वाट बघितली. सकाळपर्यंत ते आले नाहीत. म्हणून आम्ही तक्रार दाखल केली.

जेव्हा जेव्हा पोलिसांचे फोन येत होते तेव्हा ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करु शकत नाही. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचे आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे. मनसुख हिरेन यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करुन त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी निकटवर्तीयांनी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या