लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
२००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपचा विजेता भारतीय संघ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपचा मुख्य दावेदार असेल असे बटलरचे म्हणणे आहे. वर्ल्डकपच्या संभाव्य विजेत्यांमध्ये यजमान संघाचा देखील विचार केला जातो. पण भारता सारखा मजबूत संघ असतो तेव्हा तो मुख्य दावेदार असेल. अनेक संघांची कामगिरी शानदार अशी आहे.
गेल्या काही वर्षात यजमान संघांनी वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारत देखील या फॉर्मेटमध्ये मजबूत आहे. टी-२० मध्ये भारत ज्या पद्धतीने खेळतो आणि मायदेशात खेळण्याचा होणारा फायदा यामुळे भारत यावर्षाचा मुख्य दावेदार असेल, असे बटलर म्हणाला. भारताविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसंदर्भात बोलताना बटल म्हणाला, आमच्याकडे वर्ल्डकपच्या आधी संघात समन्वय करण्याची मोठी संधी आहे. ही मालिका आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असेल. आशा आहे की आम्ही विजयी होऊ. वर्ल्डकपच्या आधी भारताविरुद्ध खेळणे ही एक संघ म्हणून चांगली संधी आहे.
0 टिप्पण्या