Ticker

6/Breaking/ticker-posts

सचिन वाझे यांचीअंबानी यांच्या घराबाहेर 'सीन रिक्रिएशन'

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅटीलीया निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएच्या तपासाला वेग आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले सचिन वाझे यांना आज थेट घटनास्थळी नेण्यात आले. तिथे जवळपास दीड तास स्फोटके नेमकी कशी ठेवली गेली हे समजून घेण्यासाठी 'सीन रिक्रिएशन' केले गेले. वाझे यांना तीनवेळा आहे त्याच वेषात तर नंतर सदरा घालून चालायला लावण्यात आले.

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवली त्यावेळी सचिन वाझे तिथे हजर होते, असा एनआयएला संशय आहे. याठिकाणी जिलेटिनच्या कांड्यांसह एक स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. त्या कारसोबत एक इनोव्हा गाडीही होती आणि त्यातून उतरलेली व्यक्ती म्हणजे सचिन वाझे होते का, याचा तपास एनआयएकडून सुरू आहे. इनोव्हातून उतरलेल्या व्यक्तीने सदरा घातला होता व डोक्यावर रुमाल ठेवला होता. ही व्यक्ती काही अंतर चालून परत मागे आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हे फुटेज तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरले असून त्याचा फोड करण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. त्यासाठीच थेट घटनास्थळी जाऊन आज संपूर्ण घटनाक्रमाचं प्रात्यक्षित केलं गेलं.

सचिन वाझे यांना घटनास्थळी नेण्यात आलं. यावेळी एनआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम उपस्थित होती. सुरुवातीला काही पॉइंट मार्क करण्यात आले आणि त्यानंतर आहे त्याच साध्या वेषात वाझे यांना चालण्यास सांगण्यात आलं. अशाप्रकारे तीवेळा त्यांना पुढे जाऊन मागे येण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांना सदरा देण्यात आला. सदरा घालून तसेच डोक्यावर रुमाल ठेवून वाझे यांना परत एकदा चालण्यास सांगण्यात आले. जवळपास दीड तास हे सीन रिक्रिएशन सुरू होतं. त्यानंतर वाझे यांना घेऊन एनआयए टीम माघारी गेली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या