लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई:-बॉलिवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू दाखवणारी
महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका वैशाली माडे ही आता राजकारणात सूर लावणार आहे, म्हणजेच
ती लवकरच राजकारणात येत आहे. वैशाली लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश
करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
३१ मार्च २०२१ रोजी मुंबईतील राष्ट्रवादी
कॉंग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया
सुळे यांच्या उपस्थित वैशाली माडेचा
पक्ष प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोण आहे वैशाली
माडे?
वैशाली ही शेतकरी
कुटुंबातून आली आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिनं
पार्श्वगायन केलंय. ' भारतरत्न' लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती जबरदस्त
फॅन आहे.
' बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या
गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. तसंच तिनं 'कलंक' या हिंदी सिनेमातील 'घर
मोरे परदेसिया' हे गाणं गायलंय. मराठी सिनेमातही तिनं अनेक
गाणी गायली आहेत.
' सारेगमप'
या स्पर्धेची विजेती ठरल्यानंतर वैशालीला हिंदी सारेगमप या शोसाठी
विचारणा झाली. पण त्यावेळी वैशाली नऊ महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे अशा
परिस्थितीत शोमध्ये सहभागी होणे तिला शक्य नव्हते. तिने वाहिनीजवळ एक महिन्याच्या
कालवधी मागितला. डिलिव्हरी झाल्यानंतर आठ दिवसांतच वैशाली या शोमध्ये सहभागी झाली.
आठ दिवसांच्या मुलीला ग्रीन रुममध्ये ठेऊन वैशाली शोचे शुटिंग केले. या शोचीदेखील
ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसंच वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून
सहभागी झाली होती. वैशालीनं तिच्या गायनाच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता
मिळवलीय. तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.
0 टिप्पण्या