लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
चिचोंडी:- पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी ते खोसपूरी या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी व डांबरीकरणासाठी या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पालवे यांनी सांगितले की राष्ट्रसंत
आनंदऋषीजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या चिचोंडी येथे येणाऱ्या भाविक भक्तांची
संख्या लक्षात घेता चिचोंडी ते खोस्पुरी हा रस्ता या भाविकांच्या मार्गासाठी
महत्त्वाचा असून नगर औरंगाबाद महामार्गसह कल्याण विशाखापट्टणम या दोन्ही
महामार्गापासून चिचोंडी हे तीर्थक्षेत्र मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या रस्त्याच्या
डांबरीकरणासाठी आता भरीव निधी मंजूर झाला असून पूर्वी हा रस्ता तीन मीटर रुंदीचा
होता आता हा रस्ता साडे पाच मीटर रुंदीचा होणार असून यामध्ये खोसपुरी ते
आव्हाडवाडी पर्यन्तच्या रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये यामध्ये चार नवीन पुल देखिल
बांधले जाणार आहेत.
तसेच चिचोंडी ते शिराळ
परिसर पर्यंतच्या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये रुपयांचा निधी मिळणार असून चिचोंडी
बस स्थानक परिसरात देखील रस्ता रुंदीकरण होणार असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने
होणारी वाहतूक कोंडी या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दूर होणार आहे. मंत्री
तनपुरे यांनी पहिल्याच टप्प्यात साडेपाच कोटी रुपयांचा भरीव आसा निधी या
रस्त्याच्या कामासाठी दिल्याने या भागातील नागरिकांमधून मंत्री तनपुरे यांना व पाठ्पुरावा
केल्याबद्धल संभाजीराव पालवे यांना धन्यवाद दिले आहेत.
0 टिप्पण्या