लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर :- जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहमदनगर या कार्यालयामार्फत
ऑनलाईन रोजगार मिळाव्याचे आयोजन दिनांक 15 ते 16 मार्च, 2021 रोजी
दोन दिवसाच्या कालावधीत करण्यात आले आहे. जिल्हयातील
कायझन इंजिनिअनिरींग एमआयडीसी, सागर इंडस्ट्रीज एमआयडीसी, युरेका
फोर्ब्स लि. अहमदनगर, साई
इंजिनिअरिंग एमआयडीसी, सिध्दी
सिएनसी प्रा.लि.एमआयडीसी, आसरा
इंजिनिअरिंग एमआयडीसी, श्री.
व्यंकटेश
मल्टिस्टेट को-ऑप सोसायटी इत्यादी उद्योजक सहभागी होऊन ऑनलाईन मुलाखती घेण्यात
येणार आहेत.
अहमदनगर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार
उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या
वेबपोर्टलवर आपली नाव नोंदणी करुन आपल्या पात्रतेनुसार उद्योजकांकडे अप्लाय
करण्यात यावा व सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त
वि.जा. मुकणे, जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या 0241-2425566 या
दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा
0 टिप्पण्या